मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. जॅस्मिननं तिच्या नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. व्हाईट स्कर्ट, येलो टॉप अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅस्मिननं शेअर केले आहेत. 'Don’t look at the caption , look at me' असं कॅप्शन जॅस्मिननं या फोटोला दिलं आहे. जॅस्मिन ही मॉडर्न तसेच ट्रेडिशन अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. टशन-ए-इश्क , दिल से दिल तक आणि नागिन या मालिकांमध्ये जास्मिननं प्रमुख भूमिका साकारली. बिग बॉस 14 मुळे जॅस्मिनला विशेष लोकप्रियता मिळाली. वानम या तमिळ चित्रपटामधून जॅकलिननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जॅस्मिनला इन्स्टाग्रामवर 7.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. जॅस्मिनचा चाहता वर्ग मोठा आहे.