बी-टाऊनच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत जान्हवी कपूर पहिल्या क्रमांकावर आहे.
जान्हवी अनेकदा तिच्या फॅन्सी स्टाइलने लाखो चाहत्यांची मने जिंकते. पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या बोल्ड एक्स्प्रेशनने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
ब्लू कलरच्या डीप नेकलाइन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
हलक्या मेकअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर नुकतीच 'बवाल' चित्रपटात दिसली आहे.
या चित्रपटात ती पहिल्यांदाच वरुण धवनसोबत दिसली आहे. याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातही दिसणार आहे.
जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.