दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'सुभेदार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेते अजय पुरकर हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटामधील 'मावळं जागं झालं रं...' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.

आता सुभेदार या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ हे गाणं रिलीज झालं आहे.

या गाण्याला युट्यूबवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘आले मराठे आले मराठे’ हे गाणं दिग्पाल लांजेकर यांनी अवघ्या पाच मिनिटात लिहिलं आहे.

दिग्पाल यांनी लिहिलेल्या या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

युट्यूबवर या गाण्याला अवघ्या चार तासात 57 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

तसेच अनेकांनी या गाण्याला कमेंट करुन गाण्याचं कौतुक केलं आहे.

तसेच अनेक नेटकऱ्यांनी या गाण्याला लाइक देखील केलं आहे.

'सुभेदार' हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.