सध्या आंब्याचा (Mango) सीजन सुरु आहे. त्यामुळे आंब्यांना चांगले दर मिळत आहे
पण अशात आंब्यांना जांभळाने (Jambhul Fruit) मागे टाकले आहे.
कारण आंब्यापेक्षा जांभळं महाग झाली आहेत. विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे.
त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे.
विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका
जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे.
त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे.
काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयापर्यंत झाला आहे.