जळगाव जिल्ह्यातश्री सिद्धी महागणपती भव्य असं देवस्थान उभारण्यात येत आहे.
याठिकाणी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची
आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त
श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात येत आहे.
या ठिकाणी देशात कुठेही नाही, एवढी तब्बल 31 फूट उंचीच्या
श्री गणेशाच्या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.
दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला,
त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला.