यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहायला मिळाले. उकडीचे मोदक, तिरंग्याचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, चॉकलेटचे मोदक, विड्याच्या पानापासून बनविलेले मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक होते. सगळ्याच मोदकांची सजावट अतिशय आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दोन वर्षांनंतर सण, समारंभ साजरे केले जात आहेत. सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. लहान मुलांना आवडणारे चॉकलेट मोदकही यावेळी स्पर्धेचे खास आकर्षण ठरले.