मित्रांप्रमाणे आपल्याकडेही चारचाकी वाहन असावं, असा हट्ट करणाऱ्या शेतमजूर बापाने स्वतःच जीप तयार केली. जळगाव जिल्ह्यातील वाकोद गावात शेतमजुराने ही जीप बनवली. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी बापाने बनवलेली ही जीप चर्चेचा विषय बनली आहे. शेतमजूर असलेल्या ज्ञानेश्वर जोशी यांच्या मुलाने आपणही वाहन खरेदी करावं, असा हट्ट धरला होता. जोशी यांच्या मित्राच्या गॅरेजजवळ उभं असताना, मित्र एका कारची दुरुस्ती करत असताना पाहिलं. यावरुन त्यांना मुलासाठी घरच्या घरी कार बनवण्याची कल्पना सुचली. ज्ञानेश्वर जोशी यांनी भांगरातून गाडीसाठी लागणारे साहित्य गोळा केलं आणि मित्राच्या सहाय्याने गाडी बनवण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर जोशी यांनी महेंद्राची ही जीप लहान आकारात बनवण्याचा निर्णय घेतला. जवळपास सत्तर हजार रुपये खर्च करुन आणि दोन महिने काम करुन त्यांनी लहान आकारातील जीप बनवली.