मात्र वाढत्या किमती मुळे प्रत्येकालाच ते घेणं शक्य होत नाही.
सर्वसामान्य माणसाची ही अडचण लक्षात घेत अतिशय कमी खर्चात कुठेही घेऊन जाता येईल अस फोल्डिंगचे घर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रा नितीन दांडेकर यांनी बनवलं आहे.
या घराची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा आहे.
प्रा नितीन दांडेकर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील आहेत.
या ठिकाणी त्यांचं स्वतःच घर आहे. मात्र त्यांची नोकरी एरंडोल तालुक्यात असल्याने त्यांना पुन्हा खूप खर्च करून घर नको होतं.
याच दरम्यान ते एखाद्या घराचा शोध घेत असताना त्यांना नाशिक येथील त्यांचे मित्र अभियंता आणि वास्तुतज्ञ सारंग आणि वैशाली पाटील यांनी अतिशय कमी खर्चात तेही काम झाल्यावर सहजपणे कुठेही घेऊन जाता येईल असं घर होऊ शकतं असा सल्ला दिला.
प्रा नितीन दांडेकर यांना सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही. मात्र सारंग पाटील यांनी त्यांना त्यांनी बनविलेल्या अनेक घरांच्या साईट दाखविल्या. नंतर प्रा दांडेकर यांना ते पटलं आणि त्यांनी त्याचं बुकिंग करून घेतलं.