मिठाईची लालसा शांत करण्यासाठी आपण आणखी एक गोष्ट खाऊ शकतो ती म्हणजे गूळ.

गुळामध्ये सोलेनियम, लोह, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

थंडीच्या दिवसांत उष्ण प्रभाव असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गुळाचा प्रभाव देखील गरम आहे, त्यामुळे हा आरोग्यासाठी चांगला आहे.

गूळ खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता राहते, त्यासोबतच शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत होते.

गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण असल्याने हाडांच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. म्हणूनच त्याचे सेवन करणे चांगले आहे.

गुळाच्या वापराने सर्दी आणि फ्लूही बरा होण्यास मदत होते. जेव्हा तुम्हाला खूप सर्दी होते तेव्हा काळी मिरी आणि गुळाचे सेवन सुरू करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.