अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत आहे.



अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे.



अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता.



जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.



मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं जॅकलिनला काही महागड्या भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू कोणत्या ते जाणून घेऊयात....



सुकेशनं 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.



तसेच जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील गिफ्ट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे.



तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.



रोलेक्स, रॉजर डुबुईस आणि फ्रँक मुलर या ब्रँड्सची घड्याळं जॅकलिनला सुकेशनं दिली.



YSL,Gucci, Louis Vuitton, Louis Vuitton या ब्रँड्सचे शूज देखील सुकेशनं जॅकलिनला दिले. सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनसाठी एक प्रायव्हेट जेट भाड्याने घेतले होते.