जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांच्या 'मस्त में रहने का' या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ 'मस्त में रहने का'या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहेत. मस्त में रहने का' हा विनोदी सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ या दोघांनीही हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवली आहे. पण आता 'मस्त में रहने का' या सिनेमाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. एकटे राहणाऱ्या दोन म्हाताऱ्यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.शेवटी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची गोड केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे चाहते आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्राईम व्हिडीओवर 240 देशांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.