रोहित सराफचे विंटर स्पेशल लूक्स पहा.. रोहित सराफने गेल्या काही वर्षांत त्याच्या उत्तम कामाने प्रेक्षकांचे कायम मनोरंजन केले. या अभिनेत्याने त्याची जॅकेट्सची एक वेगळी आवड जोपासली असून तो फॅशन आयकॉन म्हणून चर्चेत असतो. रोहित हा कायम वेगवेगळी फॅशन जोपासत असतो. रोहितच्या या हटके विंटर फॅशन ची ही खास झलक.. त्याचे स्टायलिश ब्लॅक बाइकर जॅकेट हे कायम त्याला फॅशन फ्रेंडली ठरवते. रोहितला बाइकर जॅकेट आवडतात आणि चॉकलेट ब्राऊन व्हर्जनने त्याची फॅशनेबल बाजू दाखवून दिली आहे. काळ्या प्रिंटसह रोहितचे लक्षवेधक पांढरे बॉम्बर जॅकेट हे थंडीच्या फॅशनसाठी खूप स्टायलिश आहे. रोहितचे आरामदायक मरून-टोन केलेले जॅकेट हे एकदम कमाल दिसते. हिवाळ्यात फॅशन करताना कायम रोहित सारखे जॅकेट्स प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवे.