महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर. गौतमीच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता आऊट झालं आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा सिनेमा येत्या 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढणार आहे. गौतमीचा 'घुंगरु' हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. लावणी क्वीन गौतमीचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे,तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत.