भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही सुपरहिट आहे. विराट कोहली हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. पण विराट कोहली एका सोशल मीडिया पोस्टसाठी किती रुपये घेतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? विराट कोहलीचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोट्यवधी चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे 256 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी विराट कोहली फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लोकप्रिय आहे. विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. तर माजी भारतीय कर्णधार एका ट्विटर पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये घेतो. याशिवाय विराट कोहली 18 ब्रँडसोबत काम करतो आणि त्याच्या एका दिवसाच्या जाहिरातीतून 7.50 कोटी ते 10 कोटी रुपये कमावतो. विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी आहे. यामध्ये क्रिकेट करार, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टचा समावेश आहे. वृत्तानुसार कोहलीच्या कमाईचा मोठा हिस्सा ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो. अशाप्रकारे विराट कोहलीचा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.