बीसीसीआय (BCCI) ने गेल्या पाच वर्षांमध्ये 27000 कोटीहून अधिक कमाई केली आहे.
बंपर कमाईसोबतच बीसीसीआयने मोठ्या प्रमाणात टॅक्सही भरला आहे.
क्रिकेट बोर्ड ऑफ कंट्रोल इंडिया (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. पुन्हा एकदा बीसीसीआयने आपली श्रीमंती दाखवून दिली आहे.
आर्थिक वर्ष 2018 ते 2022 दरम्यान बीसीसीआयने 27,411 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या संदर्भात माहिती दिली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं की, बीसीसीआयला हे उत्पन्न मीडिया हक्क, प्रायोजक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महसूल शेअर्सच्या माध्यमातून मिळाले आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
त्यांनी बीसीसीआयचे गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न, खर्च आणि कराची माहिती देण्याची विनंतीही सरकारला केली होती.
एका प्रश्नाच्या उत्तरात, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सभागृहात सांगितलं की, सरकार जागतिक स्तरावर क्रीडा संस्थांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती ठेवत नाही.
पण त्यांनी BCCI च्या उत्पन्नाची माहिती राज्यसभेत दिली आहे.