नुकताच हा चित्रपट आमिर खानची मुलगी आयरा खाननं पाहिला.



चित्रपट पाहिल्यानंतर इरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.



आयरानं गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.



पोस्टमध्ये आयरानं लिहिलं, 'तुम्ही एखादी गोष्ट अनुभवलेली असते, त्यामुळे जेव्हा आजूबाजूला सुरु असलेली चुकीची गोष्ट बदलण्याची तीव्र इच्छा होते.'



'या अनुभवाने तुम्हाला अनेक अडथळ्यांवर मात्र करून पुढे जायला शिकवलेले असते. तरीही तुम्ही वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. ', असंही ती म्हणाली.



पुढे ती म्हणाली, 'गंगुबाई ही जिंकली आहे. तिने जे साध्य केले त्याबद्दल तिला खरी कृतज्ञता, अभिमान आणि आनंद वाटला.'



आयरानं पोस्टमध्ये एडम प्रोजेक्टचा एक कोट देखील लिहिला आहे.



गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.



आयरा वेगवेगळ्या विषयांवरील मतं सोशल मीडियावर शेअर करते.



आयरानं गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल केलेल्या पोस्टला अनेकांनी लाइक आणि कमेंट केलं आहे.