यंदाचं आयपीएल अनेक गोष्टींमुळं चर्चेत ठरत आहे.
काही विदेशी खेळाडूंचा अपवाद सोडला असता भारताच्या युवा खेळाडूंनी यंदाचं आयपीएल गाजवलं आहे.
या आयपीएलचं वैशिष्टय म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि
महेंद्रसिंह धोनी या आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून खेळत नाहीत.
महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलच्या पहिल्या मॅचपूर्वी चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे दिलं.
यामुळं महेंद्रसिंह धोनीचं हे शेवटचं आयपीएलं असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यामुळं चेन्नईची मॅच ज्या मैदानात असेल तिथं त्याचं प्रेक्षकांकडून स्वागत केलं जात आहे.
चेन्नईच्या प्रेक्षकांनी देखील महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात कधी उतरणार याची वाट पाहिली.
चेन्नईला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.
त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल.
चेन्नईला चार सामन्यात दोन पराभव आणि दोन विजय मिळाले आहेत.
तर कोलकाता संघाने आपल्या तिन्ही सामन्यात बाजी मारली आहे.