हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला प्रभावी कामगिरी करता आली नाही
मुंबईला सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला
हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला
काही चाहत्यांनी रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करा, अशी मागणी केली.
भारतीय माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केले.
रोहित शर्मा याआधी मुंबईचं नेतृत्व करत होता. आताही तो नेतृत्व करेल, फक्त पडद्याआडून
टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना श्रीसंत म्हणाला की, आपण सचिन तेंडुलकरला माही भाईच्या नेतृत्वात खेळताना पाहिलं.
आपण वर्ल्डकप जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा खेळतोय, तर चर्चेला उधाण आलेय.
रोहित शर्मा नेतृत्वाशिवाय बेभान होऊन खेळेल. तो यंदा ऑरेंज कॅपही जिंकू शकतो. रोहितसाठी यंदाचा हंगाम शानदार असेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरले आहे. रोहित शर्माशिवाय धोनीने पाच वेळा चषकावर नाव कोरले आहे.