आयपीएल 2022 च्या 30 व्या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईला (CSK Vs MI) तीन विकेट्स राखून पराभूत केलं.



मुंबईला पराभूत करून चेन्नईच्या संघानं या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे.



या विजयासह चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातली आहे.



या सामन्यात दोन विकेट्स घेऊन त्यानं एकाच संघाविरोधात 33 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.



मुंबईविरुद्ध सामन्यात ड्वेन ब्राव्होनं ऋतिक शॉकीन आणि डेनियल सॅम्सच्या रुपात मुंबईला दोन झटके दिले.



या विकेट्ससह त्यानं आयपीएलमध्ये एकाच संघाविरोधात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे.



आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नईच्या संघानं ब्राव्होला रिलीज केलं होतं.



मात्र, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईच्या संघानं त्याच्यावर बोली लावली. आयपीएलचा पंधरावा हंगाम ड्वेन ब्राव्होसाठी चांगला ठरत आहे.