देशातील कोरोनाचा कहर सातत्याने कमी होत आहे देशात गेल्या 24 तासांत 3993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे मात्र यावेळी कोरोनाबळींचे प्रमाण वाढले आहे गेल्या 24 तासांत 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आधीच्या दिवशी 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 66 जणांचा मृत्यू झाला होता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 49,948 इतकी झाली आहे आतापर्यंत मृतांचा आकडा 5,15,210 वर पोहोचला आहे एकूण 4 कोटी 24 लाख 6 हजार150 रुग्ण बरे झाले आहेत