रात्री उशिरापर्यंत जागरण करणं पडेल महागात पडेल. यामुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका संभवतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे.
उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे लवकर मृत्यू होण्याचा धोका असतो. एका संशोधनात ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
फिनलंडमध्ये झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे.
या संशोधनानुसार, जे लोक दिवसा जागे असतात त्यांच्या तुलनेत रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या लोकांचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
रात्री लवकर झोपणाऱ्या व्यक्तींपेक्षा रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्यांच्या मृत्यूची शक्यता 9 टक्क्यांनी वाढते, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
1981 ते 2018 दरम्यान 24,000 जुळ्या मुलांच्या आरोग्यावर संशोधन करण्यात आलं. या संशोधनामध्ये त्याच्या झोपेच्या वेळा आणि सवयींबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
1981 ते 2018 या 37 वर्षांच्या कालावधीत 8,728 मृत्यूची नोंद झाली.
यानुसार, रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांचा मृत्यू रात्री लवकर झोपलेल्या लोकांपेक्षा आधी झाल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
संशोधकांच्या मते, जे लोक उशिरा झोपतात त्यांच्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं जातं.
मेलाटोनिन हार्मोन उशिरा सोडलं गेल्यामुळे झोप उशिरा येते, तसेच त्या व्यक्तीला सकाळी लवकर उठता येत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.