ओमिक्रोन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटनं जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे.



हा नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षा धोकादायक असल्याचं बोललं जात आहे.



आता यासंदर्भात एक सकारात्मक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. रवी गोडसे यांनी दिलीय.



डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलं की, कोरोनाच्या विविध व्हेरिएंटसोबत दोन हात करण्यात भारतीय सक्षम आहेत.



रोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबतही सुरुवातीला अशीच माहिती समोर आली होती की, डेल्टा आधीच्या विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे.



मात्र, डेल्टाचा भारतात जास्त संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं नाही.''



ओमिक्रोन हा नवा व्हेरिएंट पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला.



नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठीअनेक देश सतर्क झाले असून त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.



अमेरिका, युरोप, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे.