एनसीसीची स्थापना 15 जुलै 1948 रोजी करण्यात आली.

नोव्हेंबर महिन्याच्या दर चौथ्या रविवारी एनसीसी दिवस साजरा करण्यात येतो.

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एनसीसी कॅडेटची भूमिका

एनसीसीमध्ये सहभाग घेण्यासाठी भारतीय नागरीक असणे आवश्यक आहे.

शिवाय नेपाळच्या नागरिकांनाही एनसीसीमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

एनसीसीत प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वर्ष आणि अधिकाधिक 26 वर्ष अशी वयोमर्यादा आहे.

एनसीसीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रवेश घेता येऊ शकतो.

मुलांच्या विभागाला कनिष्ठ विभाग (JD) आणि वरिष्ठ विभाग (SD) आणि मुलींच्या विभागाला ज्युनियर विंग (JW) आणि वरिष्ठ विभाग (SW) म्हणतात.

एनसीसीच्या स्थापना दिवसानिमित्ताने विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड महासाथीच्या काळात काही ठिकाणी एनसीसीच्या कॅडेट्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.