भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेत नाहीत. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी 20 मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसेल. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
मागील काही दिवसांपासून विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आहे, त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात होणाऱ्या टी 20 मालिकेत आणि आयरलँड दौऱ्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसेल. विराट कोहली थेट इंग्लंडविरोधात इंग्लंडमध्ये खेळताना दिसेल. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
त्यानंतर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका खेळली जाणार आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)
9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. (Photo Credit: Virat Kohli Facebook Account)