‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आज (28 एप्रिल) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.



केवळ दक्षिणात्यचं नव्हे, तर बॉलिवूड विश्वातही संमथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर हक्काचे स्थान निर्माण केले आहे.



परंतु, अभिनेत्रीचा आजवरचा प्रवास इतका सोपा नव्हता. प्रचंड संघर्ष आणि मेहनत करून समंथा आज इथवर पोहोचली आहे.



समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी केरळमध्ये झाला. समंथाचं खरं नाव यशोदा असलं, तरी जग तिला समंथा म्हणून ओळखतं.



समंथाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तिच्या शिक्षणासाठीही कुटुंबाजवळ पैसे नव्हते. समंथाने छोटी-मोठी कामं करून आपलं शिक्षण पूर्ण केलं.



दिवसातून केवळ एकच वेळ अन्न खाऊन ती जगत होती. यानंतर तिने केवळ अर्थार्जनाचं साधन म्हणून मॉडेलिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला.



दक्षिणात्य चित्रपट निर्माते रवि वर्मन यांनी समंथाला पहिल्यांदा अभिनयाची संधी दिली. मॉडेलिंग करत असतानाच रवि वर्मन यांनी समंथाला चित्रपट ऑफर केला.



अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 2010मध्ये ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.



अभिनेत्रीने तामिळ, तेलगू, हिंदी भाषेतील सुमारे 65हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.



‘साऊथ क्वीन’ समंथा रुथ प्रभू सध्याच्या घडीला 11 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 80 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.