जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब पूल' उभारला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज ठरणार आहे.

Image Source: PTI

यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे.

Image Source: PTI

ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.

या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

Image Source: PTI

रामबन जिल्ह्यातील संगलदान आणि रियासी दरम्यान ट्रायल ट्रेन चालवण्यात आली आहे.

Image Source: PTI

हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे जो रामबन जिल्ह्यातील सांगलदानला रियाशी जोडतो.

Image Source: PTI

हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असून जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.

Image Source: PTI

1315 मीटर लांबीच्या चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

Image Source: PTI

आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे.

Image Source: PTI