पीएनजी कनेक्शन कसं मिळवायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

अनेक देशांमधील सुरू असलेल्या तणावाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला असून, त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत.

Image Source: pexels

पण ज्या घरांमध्ये पीएनजी कनेक्शन आहे, तिथे लोकांना फारशी अडचण आली नाही.

Image Source: pexels

बऱ्याच लोकांना पीएनजी कनेक्शन म्हणजे काय, ते घरी कसे घ्यायचे? हे माहित नाही, चला तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

या गॅससाठी सिलिंडरप्रमाणे घरपोच मागवण्याची गरज नसून, तो थेट पाइपलाइनद्वारे तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचतो.

Image Source: pexels

जर तुमच्या परिसरात पीएनजीची (PNG) पाइपलाइन आधीच टाकलेली असेल, तर तुम्ही सहजपणे यासाठी अर्ज करू शकता.

Image Source: pexels

त्यासाठी तुम्हाला IGL च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल, त्यानंतर कंपनी पुढील प्रक्रिया सुरू होते.

Image Source: pexels

अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी असून, त्यासाठी कनेक्शन फॉर्म भरावा लागतो. या फॉर्ममध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि ईमेल आयडी यांसारखी तपशीलवार माहिती द्यावी लागते.

Image Source: pexels

कंपनी तुम्हाला पेमेंट लिंक पाठवते, पेमेंट केल्यानंतर तुमच्या घरी कनेक्शन लावण्याची प्रक्रिया सुरू होते.

Image Source: pexels

जोडणीसाठी सुरुवातीला शुल्क भरावे लागते, साधारणपणे 6000 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क आणि 1000 रुपये सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉजिट) असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels