हवा महल हा जयपूर, राजस्थानातील एक ऐतिहासिक राजवाडा आहे, जो राजधानी दिल्लीपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

हा राजवाडा, लाल आणि सॅन्डस्टोनने बांधला गेला आहे आणि वाऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे.

Image Source: pexels

1799 मध्ये महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी या अद्वितीय वास्तुकलेची निर्मिती केली होती. खेत्री महालाच्या रचनेने प्रेरित होऊन त्यांनी हवा महल बांधला.

Image Source: Depositphotos

हवा महलची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या अनेक लहान खिडक्या आणि बाल्कनी आहे.

Image Source: pexels

राजघराण्यातुन बाहेरील जग पाहता यावे या उद्देशाने जाळीच्या खिडक्या बांधल्या. त्याचबरोबर राजवाडा आतून थंड आणि हवेशीर राहावा हा उद्देश साधला गेला.

Image Source: pexels

राजवाड्यात 953 लहान खिडक्या, गुलाबी जाळी, कमानीचे छत आणि कॉर्निसेस आहेत, ज्यामुळे उन्हाळ्यातही महल हवेशीर राहतो.

Image Source: pexels

हवा महल पाहण्यासाठी सर्वोत्तम सकाळची वेळ मानली जाते कारण पहाटे सूर्याच्या किरणांनी महल उजळून निघतो.

Image Source: pexels

भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेला हा राजवाडा, श्रीकृष्णाच्या मुकुटासारखा दिसतो असे मानले जाते.

Image Source: pexels

प्रसिद्ध चित्रपट ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि 'कोयल सी तेरी बोली' या गाण्याचे शूटिंग देखील येथे झाले आहे.

Image Source: google