भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 86 धावांची खेळी करुन बाद झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विश्वचषकातला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना खेळला गेला. याच सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने दमदार कामगिरी केली. रोहितने 36 चेंडूंमध्ये अर्धशतक देखील केलं. त्याच्या फलंदाजीने नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौकार आणि षट्कारांचा पाऊस पडला. पण कामगिरी करत असतानाचा रोहित बाद झाला. त्यामुळे रोहितं अर्धशतक अवघ्या काही धावांसाठी हुकलं. रोहितच्या या कामगिरी ही भारतीय संघासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यात मदत झाली आहे.