देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित वाढ झाली आहे गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे रविवारी दिवसभरात 13 हजार 958 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे सध्या भारतात 1 लाख 13 हजार 864 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 4.85 इतका आहे देशात शनिवारी दिवसभरात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला मुंबई, दिल्लीसह मेट्रो शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे रविवारी महाराष्ट्रात जवळपास तीन हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर मुंबईत 761 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BA.4 चा एक रुग्णही मुंबईत आढळला आहे