भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात बर्मिंगहॅम (Birmingham) येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे.



भारताला पहिल्या डावात 416 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 284 धावांत संपुष्टात आला.



इंग्लंडकडून यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) चमकदारी कामगिरी करून दाखवली.



त्यानं 140 चेंडूत 106 धावा केल्या. ज्यात 14 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.



या शतकाच्या जोरावर बेअरस्टोनं खास विक्रमाला गवसणी घातलीय. या वर्षी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा पहिला फलंदाज ठरलाय.



भारताविरुद्धच्या पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही.



इंग्लंडनं पहिल्या डावात 44 धावांवर तीन विकेट्स गमावले. मात्र, यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेअरस्टोनं डावाची धुरा सांभाळली.



भारतविरुद्ध कसोटी सामन्यात शतक झळकावून बेअरेस्टोनं विक्रमाला गवसणी घातली.



यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच शतक झळकावणारा बेअरस्टो पहिला खेळाडू ठरलाय.



त्याच्यानंतर या यादीत दक्षिण आफ्रिकेचा उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूटचा समावेश आहे.