देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे



देशात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे



देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली असून कोरोनाबळींची संख्यादेखील 50 टक्क्यांहून अधिक घटली आहे



शुक्रवारी देशात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद आणि 67 रुग्णांचा मृत्यू झाला होता



देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे



शुक्रवारी मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 67 इतका होता. त्यामुळे देशात कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही घटल्याचं दिसून येत आहे.



गेल्या 24 तासांत 18,143 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत



देशात एकूण 4 कोटी 32 लाख 10 हजार 522 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.



देशात एकूण 5 लाख 26 हजार 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.