पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळं खुलून निघतात.

पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटनस्थळं खुलून निघतात.

त्यातल्या त्यात पाण्याने भरलेली धरणे ही पावसाळी पर्यटकांची एक आकर्षणाची गोष्ट असते.

बुलढाण्यातील 'क्वीन नेकलेस' अशी ओळख असलेलं धरण देखील पर्यटकांनी खुलुन गेलं आहे.

मेहकर तालुक्यातील डोंगर दऱ्यांच्या खाली देऊळगाव साकरशा गावाजवळ असलेलं उतावळी नदीवरील उतावळी धरण.

या धरणाला 'क्वीन नेकलेस' असंही म्हटलं जातं. याचं कारण आहे ते धरणाच्या सांडव्याची अनोखी रचना.

अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा. त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी.

अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा. त्यावरून वाहणारं स्वच्छ पाणी.

यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी असा दिसणारा हा सांडवा.

यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी असा दिसणारा हा सांडवा.

आता यावर्षी हे धरणं जुलै महिन्यातच पूर्ण भरलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अनेक धार्मिक , ऐतिहासिक , नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत.

आता उतावळी धरणं अर्थात क्वीन्स नेकलेस हे सुद्धा नवीन पर्यटनस्थळ नावारूपास येत आहे.