जगातील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे
उत्तर-पश्चिम अल्जेरियातील सहारा वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे
त्यामुळे सहारा वाळवंटावर जणू बर्फाची चादर पसरली आहे
जवळपासच्या शहरांमधील नागरिकांसाठी वाळवंटातील तीव्र उष्णतेपासून काहीसा आराम मिळाला आहे
सहारा वाळवंटाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या ऐन सेफ्रा शहरातील बर्फवृष्टी झाली
बर्फाच्या स्फटिकांमुळे वाळवंटातील वाळूमध्ये नक्षीकाम केल्याचा भास होत आहे
अॅटलास पर्वतांनी वेढलेल्या शहरातील तापमान गेल्या तीन रात्री उणे दोनच्या खाली गेले
बर्फाच्छादित सहारा वाळवंटाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाळवंटात बर्फवृष्टी होण्याची ही पहिली वेळ नाही याआधी 2021, 2018 आणि 2017 मध्ये देखील बर्फवृष्टी झाली होती.