डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघानं 34 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं.
या विजयासह भारतीय महिला संघानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय.
पहिल्या टी-20 सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय.
पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून दीप्ती शर्मानं 8 चेंडूत 17 धावांची तुफानी खेळी केली. यासह तिनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पा गाठला आणि 50 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केल्या.
दीप्ती शर्मानं टी-20 कारकिर्दीत भारताकडून आतापर्यंत एकूण 59 सामने खेळले आहेत. ज्यात तिनं 515 धावा आणि 61 विकेट्स घेतल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी दीप्ती शर्मा पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी दीप्ती शर्मा पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 25 जून रोजी खेळला जाणार आहे.
तर, या मालिकेतील तिसरा आणि अखरेचा टी-20 सामना 27 जून रोजी खेळला जाईल.
टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.