फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्ध आणि संजना यांचं नातं घटस्फोटाच्या वळणावर पोहोचलं आहे. अशातच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुपालीनं काही दिवसांपूर्वी एक सुंदर, पारंपारिक फोटोशूट केलं आहे. मराठमोळ्या साजात रुपाली खूप सुंदर दिसतेय. रुपालीचा हा दिलकश अंदाज चाहत्यांनाही आवडला असून, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.