भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडिया (Team India) नं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवस सलामीवीर केएल राहुल (KL Rahul)च्या नावे राहिला राहुल 122 धावा बनवून अजूनही मैदानात आहे. आज राहुलकडे सचिन आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. राहुलच्या 122 धावांच्या बळावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी 3 विकेट्सवर 272 धावा केल्या. राहुलनं कसोटीतलं आपलं सातवं शतक साजरं केलं.