अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान चर्चेत आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर लावण्यात आला होता. शिझान खानला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अभिनेता शिझान खानला आज दुपारी वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे. वसई पोलीस शिझानची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहेत. पोलिसांनी शिझानचा फोन जप्त केला असून त्याच्या फोनमधील तुनिषासोबतचे चॅट आणि रेकॉर्डिंगचा तपास घेतला आहे. शिझान आपल्या जबाबात म्हणाला,करिअरकडे लक्ष देण्यासाठी मी तुनिषासोबक ब्रेकअप केला होता. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या अडचणीत वाढ होणार आहे. तुनिषा आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलीस शिझान खानची सतत चौकशी करत आहेत.