भव्य अशी दर्शन रांग शिर्डीच्या साईमंदिरात साकारण्यात आली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit)आहेत.

शिर्डीच्या साई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये सुसज्ज दर्शन रांगेची पायाभरणी भाविकांच्या सुलभतेसाठी करण्यात आली.

त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना साईबाबांचं दर्शन घेणे सुलभ होणार आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यानंतर शिर्डीच्या दिननदर्शिकेचे प्रकाशन देखील झाले.

यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वातानुकूलित सुसज्ज अशी दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यात आले.

दोन मजली दर्शन रांग असून पहिल्या मजल्यावर सहा मोठे हॉल असून खालच्या मजल्यावर सहा हॉल असणार आहेत.

विशेष म्हणजे तिरुपती बालाजीच्या धरतीवर ही दर्शन रांग बनवण्यात आलेली आहे.

68 काउंटर्सवर पासेस मिळणार असून 48 काउंटरवर निशुल्क पास मिळणार आहे, तर 20 काऊंटरवर सशुल्क पास भाविकांना दिला जाणार