बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नेहमीच तिच्या चित्रपट आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त भूमी बोल्डनेसच्या बाबतीतही मागे नाही. अभिनेत्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते, भूमीच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. यावेळी भूमीने तिच्या एका फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये अभिनेत्री अतिशय वेगळ्या आणि सिझलिंग अवतारात दिसत आहे. यावेळी भूमीने प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे. भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती अक्षय कुमारसोबत 'रक्षाबंधन' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' आणि अर्जुन कपूरसोबत 'द लेडी किलर'मध्येही दिसणार आहे.