रात्रीच्या जेवणात चांगल्या भाज्यांचा (Vegetables) समावेश करायला हवा. हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे.



रात्रीच्या जेवणात काहीही खालं तर पोटात गोळा आल्यासारखं होऊ शकतं. यामुळे पोटात गॅस होऊ शकतं, अस्वस्थ जाणवणं, पोट फुगणं अशा समस्याही निर्माण होऊ शकता.



त्यामुळे रात्रीच्या जेवणात काही भाज्यांना आवर्जून टाळायला हव्या. जेणेकरुन तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकता.



आहारात फुलकोबीचा समावेश करणं चांगलं असतं. फ्लॉवरची भाजी खाण्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. परंतु, यामध्ये सल्फोराफेन नावाचं एक संयुग आढळून येतं.



या संयुगामुळे पोटात गॅस भरणं आणि सूज येणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे फुलकोबी पचायला जड जाते.



आहारात क्रुसिफेरस कोबीच्या भाजीचा समावेश करणं अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु, तुम्ही जर रात्रीच्या जेवणात कोबी खात असाल, तर यातील अतिरिक्त फायबर आणि रॅफिनोजमुळे अॅसिडिटी आणि पोटात गोळा येऊ शकतो.



कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट फ्रॅक्टन घटक आढळून येतो. यामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पोट फुगल्यासारख राहतं.



रात्रीच्या वेळी लसूण खाणं टाळायला हवं. कारण पोटात गोळा येऊन त्रासदायक ठरु शकतं. रात्रीच्या जेवणात लसूण जास्त खात असाल तर झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.



रताळे जास्तीचे खात असाल तर पचनासाठी त्रासदायक असतं. यामध्ये स्टार्ट असतं. यामुळे पोटात गॅस आणि गोळा येऊ शकतो, जे खूप त्रासदायक ठरु शकतं.



ब्रोकोली ही कोबीच्या प्रकारातील भाजी आहे. यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर अनेक घटक आढळून येतात. यामध्ये रॅफिनोज नावाचा शुगरयुक्त घटक असल्यामुळे पचनास त्रासदायक ठरु शकतो.