बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलांचं बॉलिवूड करिअरसोबतच त्यांचं खासगी आयुष्य सुद्धा खूप चर्चेत असतं.

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल हिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, पण अभिनयाच्या बाबतीत ती कमी राहिली.

ईशाने 2004 ते 2011पर्यंत केवळ 23 चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले

2012 मध्ये ईशा देओलने लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा रामराम केला. भरत तख्तानीसोबत तिने सात फेरे घेतले.

तरीही ईशा फॅशनीस्टा आहे, तिचे नवनवे लुक्स ती सोशल मीडियाद्वारे कायमच शेअर करत असते

नुकताच ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नव्या फोटोशूटची झलक दाखवली आहे, यात अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे

ईशा या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

हलका मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे

ईशा या कॅज्युल आऊटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.