अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली



तिने 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे



अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते



तिच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांचा तुफान प्रतिसादही मिळत असतो



असेच काही फोटो सोनालीने नुकतेच शेअर केले असून या फोटोंवर अनेकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत



सोनालीने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये तिने मरून कलरचा जॅकेट आणि त्याचसोबत मॅचिंग पॅन्ट परिधान केली आहे



लूक पूर्ण करण्यासाठी तिने हूप इअररिंग्स घातले आहेत



केसांना बन स्टाईलमध्ये बांधून तिने या लूकला स्टायलिश टच दिला आहे



सध्या सोनाली 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शो मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे