चपाती जर छान मऊसूत झाली तर जेवणात आणखी मज्जा येते.



जर तुम्हाला मऊ चपत्या हव्या असतील तर चपाती छान लाटली आणि भाजली गेली पाहिजे.



पण त्यासाठी पीठ देखील व्यवस्थित मळायला हवं.



एका परातीमध्ये पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडं थोडं करुन पाणी घाला.



आता बोटांनी पीठ एकत्र मळून घ्या.



आता हात ओला करुन पीठ मळून घ्या. पीठामध्ये मीठ घाला.



कारण मीठामुळे पीठामध्ये ग्लुटेन निर्माण होतात. यामुळे तुमची चपाती मऊ होण्यास मदत होते.



पीठ जास्त वेळ मळू नका. यामुळे पीठ घट्ट होतं. यामुळे तुमची चपाती मऊ होणार नाही.



पीठ मळून झाल्यावर एका ओल्या कापडाने कमीत कमी 20 मिनिटं झाकून ठेवा.



यानंतर तुमच्या चपात्या मऊ होण्यास नक्की मदत होईल.