मुंबई शहर 7 बेटं - कुलाबा, वरळी, माझगाव, परळ, कुलाबा, माहिम, बॉम्बे आयलंड यांनी मिळून बनलेलं आहे. ( Image Credit- Unsplash )
मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली. तसं पाहिलं तर मुंबई शहर इंग्रजांना हुंड्यामध्ये मिळालं होतं. ( Image Credit- Unsplash )
इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने 17 व्या शतकात पोर्तुगीज राजकन्या कॅथलिन डी ब्रिगेंझा हिच्याशी विवाह केला, ज्यात इंग्रजांना हुंड्यामध्ये हे शहर दिल गेलं. ( Image Credit- Unsplash )
तेव्हा हे मुंबई शहर नव्हतं तर 7 बेटं होती. या बेटांना 10 पौड वर्षाला या नुसार ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. ईस्ट इंडिया कंपनीनेच हे विखुरलेली बेटं हळू हळू जोडली. ( Image Credit- Unsplash )
ब्रिटीश कंपनीने बेटांवर पसरत असलेल्या अनेक रोगांना नियंत्रित केलं आणि या बेटांचं शहरांत रुपांतर करु लागले. ( Image Credit- Unsplash )
1708 साली माहिम आणि सायन या भागांना जोडण्यासाठी कॉजवे बांधण्यात आला 1715 साली इंग्रजांनी इथे किल्ला बांधून सुरक्षेसाठी तोफखाना बसवला. ( Image Credit- Unsplash )
1772 साली मुंबईत येणाऱ्या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी महालक्ष्मी आणि वरळी बेटाला जोडण्यात आले. ( Image Credit- Unsplash )
मुंबई शहर बनवण्यासाठी समुद्रावर अतिक्रमण देखील केलं गेलं. त्यात भराव टाकला गेला गेला आणि डोंगर सपाट केले गेले. पानथळ जागांवर ढिगारे टाकून त्याला दाबून सपाट केलं गेलं. ( Image Credit- Unsplash )
शहराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी खाड्या बांधण्यात आल्या. इंग्रजांनी या शहरावर 300 वर्षे राज्य केलं. ( Image Credit- Unsplash )
मुंबई शहराला 19 व्या शतकापर्यंत शहरात रुपांतरीत केलं गेलं. ( Image Credit- Unsplash )