टीव्हीवरील जाहिरातीतूनही संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असा संदेश दिला जातो. यातून अंड्याचं आरोग्यविषयक महत्त्व दिसून येतं.
हेल्दी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी आणि एका आठवड्यातून 7 ते 10 अंडी खाणं चांगलं असतं.
तसेच खेळाडू, धावपटू किंवा जे नियमितपणे शारीरिक कसरत करता अशा लोकांना प्रोटिन अधिक आवश्यकता असते. अशा व्यक्तींनी दररोज चार ते पाच अंडी खाणं चांगलं असतं.
ज्यांना नियमितपणे अंडी खायची सवय आहे त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खायला हवं. याशिवाय ज्यांना हृदय विकाराचा आजार आहे, ते एका दिवसात एक ते दोन अंडी खाऊ शकतात.
पण त्यापेक्षा जास्त अंडी खाणं टाळायलं हवं. अंड्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते.
पण ज्यांना आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंडी खाणं कमी करायल हवं.
यासाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. त्याशिवाय अतिरिक्त अंड्याचं सेवन करू नये.
आवश्यकते पेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. कारण यामुळे शरीरातील गर्मीचं प्रमाण वाढतं. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.