पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे मसाले अनेकदा खराब होतात.



दमट वातावरणामुळे मसाल्यांचा सुगंध निघून जातो तर त्याला किड लागण्याची देखील शक्यता असते.



त्यामुळे मसाले व्यवस्थित स्टोअर करणे आवश्यक असते.



पावसाळ्यात मसाले हे नेहमी बंद डब्यामध्ये ठेवावेत.



त्यामुळे मसाले खराब होण्याची शक्यता कमी असते.



पण जर तुम्ही मसाल्यांचे झाकण उघडेच ठेवले तर मसाले लवकर खराब होऊ शकतात.



जिथे पाणी जाणार नाही अशा ठिकाणी मसाल्यांचा डब्बा ठेवा.



मसल्याची पावडर वापरण्यापेक्षा पावसाळ्यात खडा मसाला वापरण फायदेशीर ठरु शकतं.



जेव्हा तुम्हाला मसल्यांची पावडर आवश्यक असेल तेव्हा खलबत्त्यामध्ये ती बारीक करुन वापरु शकता.



कारण पावसाळ्यात खड्या मसाल्यापेक्षा मसल्याची पावडर लवकर खराब होऊ शकते.