मेष - आज प्रवासात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात ठोस पावले न उचलल्याने तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल



वृषभ - आज व्यवसायातील भागीदारांशी वाद होऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.



मिथुन - आज कर्जमुक्ती मिळण्यास मदत होईल. व्यवसायातील न्यायालयीन वाद मिटतील. नातेसंबंधात गोडवा असेल.



कर्क - आज तुम्ही तुमच्या करिअरबद्दल गंभीर होऊ शकता, जोडीदाराची साथ मिळेल.नवीन उपक्रम सुरू करू शकता



सिंह - आज व्यवसायात केलेली गुंतवणूक विचारपूर्वक करा. बेरोजगारांनी नशिबावर विसंबून राहू नये, नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा,



कन्या - आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनासाठी वेळ काढा.



तूळ - कामाचा ताण असल्यामुळे चिंतेत असाल. तुमच्या जीवनसाथीचं महत्त्व समजून घ्या. त्यांच्या भावनांचा आदर करा. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.



वृश्चिक - चंद्र तुमच्या राशीत असेल त्यामुळे मन विचलित आणि चंचल राहील. व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मनापासून काम करावे लागेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.



धनु - आज भागीदारी व्यवसायात तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. आज तुमची दिशाभूल होऊ शकते.



मकर - आज कामाच्या ठिकाणी येणारी आव्हाने तुम्ही सहजपणे हाताळाल. कुटुंबातील कोणाशी जुने मतभेद मिटतील. वैवाहिक जीवनात दिवस शांततापूर्ण असेल.



कुंभ - आज व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. नोकरदार व्यक्तींना इतर ठिकाणांहून चांगल्या पॅकेजच्या ऑफर मिळू शकतात. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवाल.



मीन - आज कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या तुम्ही सहज सोडवाल. परिश्रमाने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.