हरतालिकेचे व्रत आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
असे मानले जाते की, पार्वतीने हे व्रत भगवान शंकराला आपले वैवाहिक जीवन अखंडित ठेवण्यासाठी केले होते.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हरतालिकेचा दिवस खूप चांगला मानला जातो.
पती-पत्नीमध्ये अंतर असल्यास हरितालिकेच्या दिवशी पती-पत्नीने शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराच्या किंवा शिवलिंगाच्या मूर्तीसमोर तुपाचा चारमुखी दिवा लावावा.
महिलांनी या दिवशी पार्वतीला सिंदूर आणि लाल बांगड्या अर्पण कराव्यात. यासोबतच ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम राहते.
हरतालिकेच्या दिवशी सकाळी स्नान करून पत्नीने आपल्या पतीच्या हळदीची गाठ हातात बांधावी, संध्याकाळी ती गाठ उघडून कपड्यात गुंडाळून मंदिरात ठेवावी
हरतालिकेच्या दिवशी पूजेनंतर कापूर जाळून घरातील सर्व खोल्यांमध्ये, विशेषतः बेडरूममध्ये फिरवा. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनावरील वाईट नजर नाहीशी होते.
हरतालिकेच्या दिवशी पती-पत्नीने शिव-शक्तीचे एकत्र ध्यान करावे. यामुळे वैवाहिक जीवन मजबूत होते.
इच्छित जोडीदार मिळवण्यासाठी अविवाहित मुली हरतालिकेच्या दिवशी हे खास उपाय करू शकतात.
यासाठी हरतालिकेच्या संध्याकाळी भगवान शिव आणि पार्वतीच्या मंदिरात जाऊन तुपाचे 11 दिवे लावा. या उपायाचा अवलंब केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते.
हे व्रत पाळल्याने पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.