चाणक्यनीतीनुसार ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत? हे सांगितले आहे.
चाणक्यनीती म्हणते की, आपले ध्येय जितके मोठे असेल तितक्या मोठ्या समस्या आपल्या असतील. या समस्यांना धैर्याने सामोरे जाणाऱ्यांना मोठे यशही मिळते.
एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच करावे लागतात असे नाही, तर काही खास गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतात,.
चाणक्यनीतीनुसार, ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत हे सांगितले आहे.
आचार्य चाणक्यांच्या मते, जीवनातील यश हे कठोर परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते.
चाणक्य म्हणतात की, विरोधक तुमच्या पराभवाची वाट पाहत राहतो. ध्येय गाठण्याच्या मार्गात शत्रू अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करतो, त्यामुळे त्याला तुमच्या मास्टर प्लॅनची कल्पनाही नसावी
सिंह कधीही शिकार मिळवण्यासाठी आपल्या लक्ष्यापासून दूर जात नाही आणि संधी मिळेल तेव्हा आक्रमकपणे हल्ला करतो. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
चाणक्य म्हणतात की ध्येय साध्य करण्यासाठी योजलेले कार्य कोणाकडेही व्यक्त करू नये, तर त्याचे रक्षण करताना विचारपूर्वक पूर्ण केले पाहिजे.
तुमची रणनीती आणि योजना लोकांना सांगताना विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण तुमची छोटीशी निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)